×
Media Coverage

“Worli Koliwada Yethe Shree Gusainji Trust and Grameen Pragati Foundationchya Joint Existing Mofat Annadhanya Vatap

  • Dec22 2024
empty

“वरळी कोळीवाडा येथे श्री गुसाइनजी ट्रस्ट आणि ग्रामीण प्रगती फौंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत अन्नधान्य वाटप

 

मुंबई : वरळी कोळीवाडा येथील कोरोनाग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात म्हणून मुंबईतील श्री गुसाइनजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ग्रामीण प्रगती फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. श्री गुसाइनजी चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्थिक सहकार्यातून ग्रामीण प्रगती फौंडेशन च्या माध्यमारन ही मदत करण्यात आली. यामध्ये प्रत्येकी 5 किलो तांदूळ, गहू, तेल, साखर, चहापावडर, मीठ, तूरडाळ, मूगडाळ तसेच साबण इत्यादी सामग्रीचे 1000 पॅकेट्स वाटप करण्यात आली. कोळीवाडा रहिवाशी संघाचे मुख्य समनव्यक श्री सुधीर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लॉकडाऊन तसेच सोसिएल डिस्टन्ससिंगचे नियमांचे पालन करून अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती ग्रामीण प्रगती फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश डफळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. वरळी कोळीवाड्यातील स्थानिकांना श्री गुसाईनजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या आर्थिक सहकार्याने ग्रामीण प्रगती फौंडेशनच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना वरळी कोळीवाडा रहिवाशी संघाचे समनव्यक श्री सुधीर पाटील व सहकारी छायाचित्रात दिसत आहेत.

Donate

You have the power to save a life!